Crime News: कन्नड तालुक्यातील शिरजगाव येथे एका शेतकऱ्याची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोघे पुरुष व एक महिला अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड/चापानेर : शेतकऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना कन्नड तालुक्यातील शिरजगाव येथे शनिवारी (ता. १२) दुपारी घडली. याप्रकरणी तिघांवर कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.