Chhatrapati Sambhajinagar News
esakal
आडुळ (छत्रपती संभाजीनगर) : अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान, सततची नापिकी, बँकांचे घेतलेले पीककर्ज व लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदत ही नाही, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी डोक्यावर आल्याने लेकराबाळांसह घरच्यांना कपडे व इतर साहित्य कसे खरेदी करावे, या विवंचनेत असलेल्या तुपेवाडी तांडा (ता. पैठण) येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने स्वतः च्या घरासमोर विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केल्याची (Maharashtra Farmer Distress) घटना रविवारी (ता.१९) रोजी घडली. मयत शेतकऱ्याचे नामदेव लालसिंग राठोड असे नाव आहे.