esakal | पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी आप्पासाहेब सातपुते

पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
दिगंबर सोनवणे

दावरवाडी (जि.औरंगाबाद) : दावरवाडी (ता.पैठण) (Paithan) येथील शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुषाने शेतातील अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. दावरवाडी येथील शेतकरी आप्पासाहेब भानुदास सातपुते (वय ४४) यांनी शेतात आलेले पुर्णच पिक जोरदार अतिवृष्टीमुळे वाया जात असलेले पाहूण व घेतलेले कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह (Aurangabad) कसा करावा, या विवंचनेतून बुधवारी (ता.१५) सकाळी साडेसहा वाजेदरम्यान गावातील खळवाडी भागातील स्वतःच्या शेतात गट नं.४३५ मधील चिंचाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ते घरच्यांना सकाळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने आरडाओरडा करत गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली उतरुन पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: पोहे इडली बनवणे सोपे, बनवा घरी

तेथे त्यास डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले व शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहिते, पवन चव्हाण यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त आप्पासाहेब सातपुते यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहीते, पवन चव्हाण व सहकारी करित आहेत.

loading image
go to top