कर्जवसुलीच्या जाचाविरोधात विधवा शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा

कर्जवसुलीच्या जाचाविरोधात विधवा शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा
Published on: 
कर्जफेडीनंतरही सातबाऱ्यावरील बोजा कायम जमीन लिलावाच्या कथित धमकीची चौकशी करण्याची मागणी औसा शहर, ता. ३१ (बातमीदार) : तीन लाख रुपयांच्या कर्जापोटी आतापर्यंत चार लाखांहून अधिक रक्कम भरूनही शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कायम असल्याचा आरोप औसा तालुक्यातील सत्तरखेडी येथील शेतकरी निर्मला राठोड यांनी केला आहे. कर्जवसुलीसाठी सातत्याने दबाव आणला जात असून शेतजमिनीचा लिलाव करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निर्मला राठोड या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी औसा शहरात शिवणकाम करतात. त्यांनी १० जून २१ रोजी महानंदा मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या लातूर शाखेकडून शेतीच्या आधारे तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.त्याची नोंद शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर करण्यात आली होती. कोरोना काळातील आर्थिक अडचणींवर मात करीत आपण आतापर्यंत चार लाख आठ हजार ३८ रुपये भरल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे. एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेअंतर्गत २९ मार्च २०२५ रोजी एक लाख ५८ हजार ९०० रुपये, तर ४ एप्रिल २०२५ रोजी ४० हजार रुपये असे एकूण एक लाख ९८ हजार ९०० रुपये भरल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, त्यानंतरही सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यात आलेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्जवसुलीसाठी वारंवार दबाव आणला जात असून शेतजमिनीचा लिलाव करण्याची धमकी दिली जात असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली शेती गमावण्याची भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती लातूरचे जिल्हाधिकारी आणि राज्याच्या महसूलमंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.