Aurangabad : मुलीचे लग्न होईल या आशेवर लावलेली केळीची बाग भाव नसल्याने तोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Destroy Banana Garden In Paithan Taluka of Aurangabad
मुलीचे लग्न होईल या आशेवर लावलेली केळीची बाग भाव नसल्याने तोडली

मुलीचे लग्न होईल या आशेवर लावलेली केळीची बाग भाव नसल्याने तोडली

sakal_logo
By
अनिल गाभूड

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्याना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. कोरोना, अतिवृष्टीमधून शेतकरी सावरत असताना आता मालाला भाव मिळत नसल्याने उभी पीक भुईसपाट करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. पैठण (Paithan) तालुक्यातील हिरडपुरी येथील शेतकरी लक्ष्मण राक्षे यांनी या वर्षी सव्वा दोन लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतात केळी (Banana Garden) लावली होती. यामधून येणाऱ्या उत्पन्नातून मुलीचे लग्न करता येईल, ही आशा त्यांना होती. म्हणून त्यांनी चार महिन्यांपूर्वी कर्ज काढून मुलीचे लग्न केले. आता केळीचे उत्पन्न आल्यावर कर्ज फेडता येईल, अशी आशा त्यांना होती. मात्र अखेर त्यांची (Aurangabad) निराशाच झाली. पीक तर आले, परंतु पिकाला भाव मिळेना.

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

व्यापारी देखील पीक नेण्यासाठी येत नसल्याने अखेर त्यांनी उभ्या केळीचे पीक जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. सरकारने अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती ते सरकारकडे करित आहेत.

loading image
go to top