आगळ्यावेगळ्या सोहळ्यात सूर्यवंशी कुटुंबीयांनी ‘ढवळ्या’चे औक्षण केले. यावेळी पंचक्रोशीतून आलेले मित्र, आप्तेष्ठांनी त्यास साजरूपी आहेर आणला होता. यावेळी ढवळ्यास पुरणपोळीचा घास भरविला.
हिमायतनगर : ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट झाली, जीवनात आर्थिक स्थैर्य आले त्याची जाणीव ठेवत कामारी (ता. हिमायतनगर) येथील शेतकरी धोंडीराम सूर्यवंशी (Farmer Dhondiram Suryavanshi) यांनी आपल्या लाडक्या ढवळ्या बैलाचा पंचविसावा वाढदिवस (Bull's Birthday) धुमधडाक्यात साजरा केला. यानिमित्त रविवारी (ता. पाच) ‘कृतज्ञता’ सोहळा झाला. या सोहळ्याच्या पत्रिका छापल्या, गावात बॅनरही लावले. गावजेवण देत रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला.