maratha reservation battle political interference manoj jarange patilSakal
छत्रपती संभाजीनगर
Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठी तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन,जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर अंत्यसंस्कार
Latest Sambhajinagar News:
Latest Maharashtra News: तालुक्यातील खामगाव येथे ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गुरुवारी (ता. १२) मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले.
मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर शुक्रवारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. त्यामुळे तब्बल वीस तास मृतदेह फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात पडून होता.