Phulambri Protest
sakal
छत्रपती संभाजीनगर
Phulambri Protest: ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा; फुलंब्री तहसील कार्यालयात अजहर सय्यद यांचे अनोखे आंदोलन
Farmer Protest :फुलंब्री तहसिल कार्यालयासमोर अजहर सय्यद यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या शेतकरी नुकसानीसाठी अनोखे आंदोलन उभे केले. त्यांनी “ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा” अशी घोषणाबाजी केली.
फुलंब्री ,संभाजीनगर : फुलंब्री – सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ओल्या दुष्काळाची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथील तहसील कार्यालयात बाजार समितीचे संचालक अजहर सय्यद यांनी सोमवारी अनोखे आंदोलन छेडले.

