Electric Shock : तुटलेल्या वीजच्या तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याने गमावला जीव
Farmer Accident News : फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार येथे तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाल्याने शेतकरी लक्ष्मण काळू म्हस्के यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
फुलंब्री : तुटलेल्या प्रवाही वीज तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वडोद बाजार परिसरात शुक्रवारी घडली. लक्ष्मण काळू म्हस्के (वय ६४, रा. वडोद बाजार, ता. फुलंब्री) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.