रामदास आठवले पत्रकार परिषद

रामदास आठवले पत्रकार परिषद
Published on: 
शेतकऱ्यांना पाच हजार ही तोकडी मदत --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला घरचा आहेर --- छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पाच हजार रुपये पुरेसे नाहीत. अधिकच्या पैशांची शेतकऱ्यांची मागणी अगदीच रास्त आहे. मी स्वतः दोन दिवस शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून या रकमेत वाढ करण्याची विनंती करणार आहे’, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आठवले हे दोन दिवस मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले आहेत. ते म्हणाले, ‘‘दुष्काळाचा फटका पशुधनालाही बसत आहे. जनावरांसाठी सरकारने एका जनावरामागे १०० रुपये देण्याची तरतूद केली आहे. मात्र, सध्याच्या खर्चाच्या तुलनेत ही मदत पुरेशी नाही. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक मराठवाड्यात आले होते. या पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्र सरकारकडून मदत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच दुष्काळाचा फटका बसलेल्या भागांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करू. पुन्हा अशा प्रकारच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देण्याची गरज आहे. वैज्ञानिकांनीही दुष्काळ रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करावा’’, असे मत त्यांनी व्यक्त केले. --- दलित पँथर पुन्हा सक्रिय करणार दलित पँथर ही चळवळ पुन्हा सुरू करण्याची लोकांची मागणी असल्याचे सांगत, ती नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली उभी राहिली पाहिजे, असे आठवले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेणारी आणि अन्यायाविरोधात लढणारी ही चळवळ असावी. मात्र, आंदोलन करताना शांत डोक्याने आणि न्यायासाठी लढण्याची भूमिका असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com