जिल्ह्यातील २.३९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा
११९ कोटी ६६ लाख रुपये वितरित, उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत रक्कम मिळणार
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ ः दुष्काळाची दाहकता गांभीर्याने घेत सरकारने राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करत पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचेही सरकारने आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारअखेर (ता. तीन) प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत जमा करण्यात आली. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.
जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले, की अग्रीम मदत करण्यात ॲग्रिस्टॅक (फार्मर आयडी) असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीसाठी प्राधान्य देण्यात आले असून अशा शेतकऱ्यांना अग्रीम मदत जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचा संबंधित यंत्रणांकडून डेटा उपलब्ध केला.
त्यानुसार शेतकऱ्यांची तपासणी आणि मान्यता प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यातील ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये मदत करण्यात आली आहे.
---
तालुकानिहाय मदत दिलेले शेतकरी
छत्रपती संभाजीनगर - १७,०३६
गंगापूर- ३२, ८५५
कन्नड- ३८,१९१
खुलताबाद- १०,८०४
पैठण- ३२८०५
फुलंब्री- १५,६५०
सिल्लोड- ३१,८१५
सोयगाव- १४,७२३
वैजापूर - ४५,४४१
एकूण - २,३९,३२०
------------------------------
((कोट))
५ लाख ९२ हजार २७२ शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला होता. दरम्यान ॲग्रिस्ट्रॅक शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये एकत्रित ११९ कोटी ६० लाख रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन दिवसांत ही मदत जमा करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी माझ्या विभागाचे सर्व अधिकारी सुटीच्या दिवशीही काम करणार आहेत.
- विनय गौडा, जी.सी., जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
---