उपग्रह सर्व्हेची अट शिथिल करून पीक विम्याची १०० टक्के भरपाई द्या;

उपग्रह सर्व्हेची अट शिथिल करून पीक विम्याची १०० टक्के भरपाई द्या;
Published on: 
उपग्रह सर्व्हेची अट शिथिल करून पीकविम्याची १०० टक्के भरपाई द्या --------------- मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी मानवत, ता. १८ (बातमीदार) : खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे केकरजवळा महसूल मंडळातील सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविम्याची भरपाई निश्चित करताना उपग्रह आधारित सर्व्हेची अट शिथिल करून प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगांच्या आधारे १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या शेंगांत दाणे भरले नसून अनेक शेंगा पोचट राहिल्या आहेत. कापसाच्या पात्या व बोंडांची मोठ्या प्रमाणात गळ झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. उपग्रह छायाचित्रांमध्ये शेतातील हिरवे आवरण दिसत असले, तरी प्रत्यक्ष उत्पादनाची स्थिती समजत नाही. त्यामुळे उपग्रह सर्व्हेच्या आधारे नुकसान ठरवल्यास शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पीक कापणी प्रयोगांतील प्रत्यक्ष उत्पादन, महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यांना प्राधान्य द्यावे. विमा कंपन्यांना योग्य भरपाई देण्याचे निर्देश देऊन बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने नुकसान भरपाई जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी ज्ञानेश्वर धोपटे, रितेश कदम,अनिल चौधरी, सुखदेव कदम, विष्णू घरळे, हनुमान आगलावे, अक्षय कदम, मदन चौधरी, धोंडीराम कदम, अजय कदम आदी शेतकरी उपस्थित होते. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com