ठेंगेवडगाव, उमरखेडा शिवारातील शेतरस्ता खुला करण्याची मागणी.

ठेंगेवडगाव, उमरखेडा शिवारातील शेतरस्ता खुला करण्याची मागणी.
Published on: 
शेतरस्ता खुला करण्याची मागणी मंठा, ता.९ : ठेंगेवडगाव -उमरखेडा शिवारात शेतीकडे जाणारा जुना रस्ता प्लॉटिंग व अतिक्रमणामुळे बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता तातडीने मोकळा करून देण्यात यावा, अशी मागणी मुन्ना लाल राधाकिसन दायमा व इतर शेतकऱ्यांनी महसूल व संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसील कार्यालयात सोमवारी (ता. ५ ) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठेंगेवडगाव, उमरखेडा शिवारातील शेतजमिनींकडे जाण्यासाठी पूर्वीपासून वापरात असलेल्या रस्त्यावर प्लॉटिंग धारकांनी प्लॉटिंग करून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच शेतीची इतर वाहने शेतात नेता येत नसल्याने पेरणी, मशागत व शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. रस्ता बंद राहिल्यास शेतकऱ्यांना शेतातील माल बाहेर काढणेही कठीण होत असून शेतीच्या कामांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना उपोषण व आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनावर मुन्ना लाल दायमा यांच्यासह कयूम कुरेशी, शिवाजी खरात, दत्ता खरात, सचिन खरात, हरिभाऊ खरात, ज्ञानदेव शिंदे, किसनराव बोराडे, कचरुलाल दायमा, सचिन बोराडे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com