बळीराजाच्या आयुष्यातील अंधार कायम!

बळीराजाच्या आयुष्यातील अंधार कायम!
Published on: 
राबराब राबले; पदरी मात्र निराशाच! केदारखेडा, ता. १५ (बातमीदार) : यंदाच्या खरीप हंगामाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांची वाढ खुंटली, तर अनेक ठिकाणी पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा मावळली आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. शेतात राबून, घाम गाळून पिकविलेल्या पिकांनीच शेतकऱ्यांची साथ सोडल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. शेतकरी पेरणीपासून काढणीपर्यंत बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीसाठी मोठा खर्च करतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात अपेक्षित उत्पन्न पडत नाही. उत्पादन घटल्याने आणि शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. एका बाजूला उत्पन्न घटले, तर दुसऱ्या बाजूला बँका आणि खासगी कर्जाचे ओझे वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ........... पंचनामे झाले; मदत कधी? नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे आणि नुकसान नोंदणीची प्रक्रिया केली जाते. मात्र, प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पंचनामे होऊनही हातात आर्थिक मदत पडत नसेल, तर या प्रक्रियेचा शेतकऱ्यांना उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.