२६ हजार शेतकप्यांना १३ कोटी रुपये मिळणार

२६ हजार शेतकप्यांना १३ कोटी रुपये मिळणार
Published on: 
अग्रिम मदतीचा २६ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ ---------- तहसील कार्यालयात कार्यवाहीला वेग, जवळपास १३ कोटींची रक्कम शिवशंकर काळे जळकोट शहर,ता.२ : यंदा पावसाने दिलेली ओढ आणि खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १३ कोटी रुपयांची रक्कम तरतूद केली जाणार आहे. या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा, यासाठी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने कार्यवाहीला वेग दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पावसातील खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, काही भागांत पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडली आहे. बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीसाठी केलेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यांचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत शेतकऱ्यांसाठी तात्पुरता आर्थिक आधार ठरणार आहे. मात्र, या मदतीचा लाभ प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याने महसूल विभागाकडून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तालुक्यातील तब्बल २६ हजार शेतकऱ्यांना तेरा कोटींची मदत जमा होणार असून यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. अग्रिमची पाच हजार रुपये मदत लवकर मिळाल्यास दिवाळीचा सण साजरा होण्यास मदत होणार आहे. महसूल नोंदणी, माहिती संकलन सध्या संबंधित गावांतील शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे, उपलब्ध महसूल नोंदी तपासणे आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार लाभार्थ्यांची पात्रता पडताळणे, अशा विविध स्तरांवर काम सुरू आहे. दरम्यान, मदत वितरणाच्या प्रक्रियेत कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, तसेच कागदपत्रे व अभिलेखांच्या पडताळणीमुळे अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी तहसीलदार लांडगे प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. निर्धारित वेळेत कार्यवाहीच्या सूचना शासनाच्या निर्देशानुसार निर्धारित वेळेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील मदत वितरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा व्हावी, अशी अपेक्षा जळकोट तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोट-- शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीसाठी महसूल प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून, शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळावा, यासाठी प्रक्रिया गतिमान करण्यात येत आहे. -राजेश लांडगे, तहसीलदार, जळकोट ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eligible farmers in Jalna district will begin receiving ₹5,000 in advance relief from Monday.
३२ कोटींची मदत मिळणार;७,२०८ शेतकरी अॅग्रीस्टॅकच्या कचाट्यात!  कळंब तालुक्यातील ६४ हजार ७९१ शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये; नोंदणी अपूर्ण असल्याने तीन कोटी ६० लाखांचे वाटप रखडण्याची शक्यता
Farmer Relief Maharashtra Government Eases Eligibility Rules for 5000 Rupees Assistance to Farmers Before Diwali Festival
CM Devendra Fadnavis