Success Story: थेरगाव येथील तरुणांची ध्येयाला गवसणी; शेतकरी कुटुंबातील तीन मुलांची मुंबई पोलिस दलात निवड
Navi Mumbai Police: थेरगाव (पाैठण) येथील तीन शेतकऱ्यांच्या मुलांनी परिस्थितीशी संघर्ष करून नवी मुंबई पोलिस विभागात राज्य राखीव पोलिस म्हणून नियुक्ती मिळवली. गावांत त्यांचा सत्कार आणि आनंदोत्सव रंगला आहे.
पाचोड : परिसरातील थेरगाव (ता. पैठण) येथील तीन शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर आकाशाला गवसणी घालत नवी मुंबई येथे पोलिस विभागात राज्य राखीव पोलिस होण्याचा बहुमान मिळविला.