Chh. Sambhajinagar Accident : ट्रॅक्टरला जीप धडकून चिमुकल्यासह तीन ठार; गंगापूरजवळ अपघात, बारा भाविक जखमी
Tractor Jeep Accident : गंगापूरजवळच्या तांबूळगोटा फाट्यावर बुधवारी रात्री ट्रॅक्टर आणि जीपचा धडक होऊन तीन जण ठार झाले, ज्यात एक चिमुकला आहे. यामध्ये १२ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंगापूर : उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून हैदराबाद येथील चिमुकल्यासह तीन जण ठार, तर १२ जण जखमी झाले. गंगापूर-वैजापूर मार्गावरील शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबूळगोटा फाटा येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.