
गेवराई : वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श करून शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली असून, तारेला चिकटलेल्या वडिलास काढताना मुलाचा देखील धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना गेवराईतील मारफळा गावात मंगळवारी घडली. अभिमान लक्ष्मण कबले (वय ४५) आणि ज्ञानेश्वर अभिमान कबले (वय २१, रा. मारफळा, ता. गेवराई) असे या दुर्घटनेत मृत झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.