Chh. SambhajiNagar : तीन अपघातात तिघे ठार; मुलगा वाचला, बापाचा मृत्यू
Accident News : फुलंब्री तालुक्यातील पाल शिवारातील शेततळ्यात वडील मुलाला वाचवण्यासाठी उतरले, पण दोघेही पाण्यात बुडाले. भाच्याने मुलाला वाचवले, मात्र वडीलांचा मृत्यू झाला.
फुलंब्री : शेततळ्यात मामा आणि मामाचा मुलगा पडल्याचे दिसताच भाच्याने शेततळ्यात उडी मारली. मामाच्या मुलाला वाचविण्यास यश आले. मात्र, मामाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ९) फुलंब्री तालुक्यातील पाल येथे घडली.