Nath Maharaj Wada : पैठण येथील नाथ वाड्यात व नाथ समाधी मंदिरात गुरुवारी चैत्र-वैशाखातील शेवटची चंदन उटी लावण्यात आली. आंब्यांच्या सजावटीत पार पडलेल्या या उत्सवात भाविकांची मोठी उपस्थिती होती.
जायकवाडी (ता. पैठण) : श्रीक्षेत्र पैठण येथील नाथ महाराजांच्या वाड्यातील श्रीविजयी पांडुरंग व बाहेरील नाथ महाराजांना वसंत ऋतूमधील चैत्र व वैशाख महिन्यातील प्रत्येक दशमीस चंदन उटी लावण्यात येते.