दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दरमहा चार हजारांचा निर्वाह भत्ता द्या

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दरमहा 
चार हजारांचा निर्वाह भत्ता द्या
Published on: 
‘विद्यार्थ्यांना दरमहा चार हजारांचा निर्वाह भत्ता द्या’ -- छत्रपती संभाजीनगर, ता. २९ : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दरमहा चार हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी गुरुवारी (ता. २९) केली. यासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनाचा आशय असा ः मराठवाड्यात पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता आहे. पुढील पीक हाती येऊन त्याची विक्री होईपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे आणि इतर प्रमुख शहरांत राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खोलीचे भाडे, भोजन, अभ्यासिका आणि शैक्षणिक खर्च भागविणे कठीण होत आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम त्यांच्या भवितव्यावर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पात्र पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शासनाने विशेष योजना सुरू करावी. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा चार हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी डॉ. पाटील यांनी निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक संधींवर होऊ नये, यासाठी शासनाने सहानूभूतीपूर्वक तातडीने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.