यापूर्वीही २००९ आणि २०१६ मध्ये या मार्केटमध्ये अशाच आगीची घटना घडल्या होत्या, असे स्थानिकांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर : येथील आझाद चौकात फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग (Furniture Market Fire in Azad Chowk) लागल्याची घटना गुरुवारी (ता. २०) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आली. या आगीत १५ हून अधिक फर्निचरची दुकाने भस्मसात झाली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचे दुर्घटनाग्रस्त फर्निचर दुकानांच्या मालकांनी सांगितले.