
छत्रपती संभाजीनगर : चेलीपुरा परिसरात ‘महावीर घरसंसार’ मॉलला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीची धग सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. इमारतीच्या कोसळलेल्या मलब्याखालून उशिरापर्यंत धूर निघत होता. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे १२ बंब आणि ३५ टँकर पाण्याचा वापर करण्यात आला.