रणजित कक्कड : सकाळ संवाद दिवाळी अंक

रणजित कक्कड : सकाळ संवाद दिवाळी अंक
Published on: 
पहिले निवासी ‘गोल्फ प्रशिक्षण केंद्र’ संभाजीनगरात ---- वंचित घटकांतील मुलांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत कोचिंग ---- ((((एन्ट्रो १))) एमजीएम गोल्फ क्लबचे संस्थापक संचालक डॉ. रणजित कक्कड मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये झालेले आहे. डॉ. कक्कड हे छत्रपती संभाजीनगर येथील एक उद्योजक, संस्थापक आणि व्यावसायिक नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत. त्यांनी लंडन साउथ बँक युनिव्हर्सिटीमधून एमबीए आणि एमजीएम विद्यापीठातून मॅनेजमेंट सायन्समध्ये पीएचडी केली आहे. शिवाय त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीशी संबंधित शिक्षणही घेतले आहे. ---- ((((एन्ट्रो २))) गोल्फ हा अत्यंत महागडा खेळ समजला जातो. या खेळासाठी लागणारी साधनसामग्री इतर खेळांपेक्षा वेगळी आणि खर्चिक असते. पण, देशभरात या खेळाचे चाहते आहेत. या खेळातील ‘हिडन टॅलेंट’ शहरातच नव्हे, तर गावे, वाडी-वस्तीवरही असू शकते. त्यामुळेच वंचित व गरजू घटकांतील (अंडर प्रिव्हिलेज्ड) होतकरू खेळाडूंना गोल्फचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी एमजीएम आणि द गोल्फ फाउंडेशन (टीजीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात देशातील पहिल्या विशेष निवासी गोल्फ प्रशिक्षण अकादमीची स्थापना करण्यात येत आहे. एमजीएम गोल्फ क्लबचे संस्थापक संचालक रणजित कक्कड यांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर शहर देशाच्या गोल्फ नकाशावर अधिक ठळकपणे उदयास येईल. ---- आंतरराष्ट्रीय सुविधा, व्यावसायिक शिक्षण शहरातील गोल्फ मैदान आणि खेळाबाबत सांगताना रणजित कक्कड म्हणाले, की ​जागतिक स्तरावर किंवा अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन अशा मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केलेल्या ‘ग्रीन’ सुविधांची अत्यंत गरज असते. हीच गरज ओळखून ‘एमजीएम’च्या भागीदारीतून छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. ​खेळाडूंना केवळ मुख्य खेळातच नव्हे, तर खेळाशी संबंधित इतर क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस), म्हणजेच ८ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांतील मुलांना गोल्फचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. काही महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेल्या ‘नॅशनल टॅलेंट हंट’मधून निवडलेल्या १५ ते २० विद्यार्थ्यांना सध्या उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जात असून, त्यातील काही खेळाडूंना दिल्ली येथेही विशेष प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. गोल्फ खेळाच्या विविध उपक्रमांविषयी आणि गोल्फच्या भवितव्याविषयी रणजित कक्कड आणि ‘द गोल्फ फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष तथा अर्जुन पुरस्कार विजेते अमित लुथरा यांनी नुकत्याच साधलेल्या संवादातून विविध पैलू उलगडले. -- २६ वर्षांत १२६ खेळाडूंना घेतले दत्तक अमित लुथरा यांनी सांगितल्यानुसार, देशातील कानाकोपऱ्यात आणि ग्रामीण भागात दडलेल्या क्रीडा गुणवत्तेला शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्याचा ध्यास ‘द गोल्फ फाउंडेशन’ आणि ‘इंडियन गोल्फ प्रीमियर लीग’ यांनी घेतला आहे. मागील २६ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या मोहिमेतून आजवर ग्रामीण भागातील तब्बल १२६ गरजू आणि गुणवंत खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांना या खेळाचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण व पाठबळ देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या यशानंतर फाउंडेशनने आपल्या कार्याचा अधिक विस्तार करत देशातील ज्या ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही ‘गोल्फ’ या खेळाचे नावही पोचलेले नाही, अशा भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आवड निर्माण केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ खेळाची माहिती न देता, त्यांना या खेळात एक्सपर्ट बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरवले जाईल. या शोधमोहिमेतूनच भारताला गोल्फ क्षेत्रातील खरा ‘कोहिनूर हिरा’ मिळेल, असा विश्वास लुथरा यांनी व्यक्त केलेला आहे. --- शासनाकडून अपेक्षा हा खेळ फारसा पदकविजेता नसल्याचे कारण सांगून शासन या खेळाकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. परंतु, खेळाडू जोपर्यंत या खेळात एंट्री करणार नाहीत, त्यांना सुविधा मिळणार नाहीत, तोपर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांची अपेक्षा कशी करणार? त्यामुळे शासन आणि उद्योगांनीही या खेळाला पाठबळ देणे अत्यंत गरजेचे आहे. --- भारतात गोल्फची मोठी प्रतिभा दडलेली : लुथरा अमित लुथरा यांच्या म्हणण्यानुसार, गोल्फ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत लोकप्रिय; परंतु तितकाच अत्यंत महागडा खेळ मानला जातो. खेळासाठी लागणारा व्यावसायिक गोल्फ सेट, एका लहान बॉलची भरमसाट किंमत आणि क्लबमधील रोजच्या सरावाचा अवाढव्य खर्च यामुळे सामान्य किंवा गरीब कुटुंबांतील मुलांसाठी हा खेळ कायम आवाक्याबाहेरचाच राहिला आहे. मात्र, या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर मात करत देशातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रतिभावान मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फपटू बनवण्यासाठी ‘गोल्फ फाउंडेशन’ आणि ‘एमजीएम’ यांनी एकत्र येत एका विशेष उपक्रमाची सुरवात केली आहे. भारतात गोल्फची मोठी प्रतिभा दडलेली आहे. आजवर योग्य संधी आणि सुविधांच्या अभावामुळे ही मुले मागे राहत होती. परंतु, आता त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हीच वंचित मुले भविष्यात जागतिक स्तरावर भारताचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील, असा विश्वासही लुथरा यांनी आहे. ---- ‘गोल्फ प्रशिक्षण केंद्रा’ची आवश्यकता का? छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि पर्यटन केंद्र आहे. या शहरात विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळत असताना गोल्फसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी अधिक व्यापक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. गोल्फ खेळण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देता येतील. तज्ज्ञ प्रशिक्षक, आधुनिक साहित्य आणि नियमित सरावाच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करता येतील. गोल्फ प्रशिक्षक, पंच, मैदान व्यवस्थापन, पर्यटन आणि क्रीडा प्रशासन अशा क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. छत्रपती संभाजीनगरला गोल्फ प्रशिक्षणाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करता येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनातून शहराच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. ----- ‘गोल्फ खेळाचे महत्त्व शारीरिक फायदे • उत्तम व्यायाम : गोल्फ कोर्सवर चालताना सरासरी ५ ते ८ किलोमीटर अंतर कापले जाते, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि कॅलरी जळतात. • दीर्घायुष्य : नियमित गोल्फ खेळणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य न खेळणाऱ्यांच्या तुलनेत सरासरी ५ वर्षांनी जास्त असू शकते. • हृदय व फुप्फुसाचे आरोग्य : ताज्या हवेत चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. • सांधे व ताकद : स्विंग करण्याच्या हालचालींमुळे पाठीचा कणा, पाय आणि हातांचे स्नायू मजबूत होतात तसेच संतुलन राखण्यास मदत होते. --- मानसिक फायदे • तणावमुक्ती : निसर्गरम्य आणि शांत वातावरणात खेळल्याने मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य कमी होते. • एकाग्रता आणि स्मरणशक्ती : चेंडूचा वेग, दिशा आणि अंतर याचा अंदाज घेण्यासाठी प्रखर एकाग्रता लागते, ज्यामुळे मेंदूचा चांगला व्यायाम होतो. • चांगली झोप : शारीरिक हालचालींमुळे रात्री गाढ आणि निरोगी झोप लागण्यास मदत होते. --- सामाजिक फायदे • संवाद आणि नेटवर्किंग : हा खेळ मित्र-परिवारासोबत किंवा नवीन लोकांसोबत खेळता येतो, ज्यामुळे सामाजिक संबंध मजबूत होतात आणि संवाद वाढतो. • सर्व वयोगटासाठी उपयुक्त : हा खेळ लहान मुलांपासून ते १०० वर्षांपर्यंतच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणताही व्यक्ती सहज खेळू शकतो. गोल्फ खेळाबद्दल किंवा तुमच्या जवळच्या गोल्फ कोर्सबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास नक्की सांगा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.