

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून, पवनचक्की खंडणी व ॲट्रॉसिटीप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने दोषारोपत्र दाखल केल्यानंतरची पहिली सुनावणी बुधवारी (ता. १२) केजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.