esakal | आपले काय चुकले हे आधी पाहा, खासदार इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

558jaleel_d

सत्तर वर्षे आम्ही तुमचा विचार केला, आता आम्ही आमचा विचार करू. कोणामुळे काय झाले याचा हिशेब मांडण्यापेक्षा तुमच्या काय चुका झाल्या त्यावर चिंतन करा, असा टोला ‘एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला.

आपले काय चुकले हे आधी पाहा, खासदार इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : ‘एमआयएम' ने मतविभाजन केल्याने बिहारमधील निवडणुकीत आम्हाला फटका बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. सत्तर वर्षे आम्ही तुमचा विचार केला, आता आम्ही आमचा विचार करू. कोणामुळे काय झाले याचा हिशेब मांडण्यापेक्षा तुमच्या काय चुका झाल्या त्यावर चिंतन करा, असा टोला ‘एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला.
येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, बिहारमध्ये ‘एमआयएम'ने २० जागा लढवून पाच जागांवर विजय मिळविला.

औरंगाबाद जिल्ह्यात ६७१ कोरोनाबाधितांवर उपचार, नवे १२६ रूग्ण

मत विभाजनाचे काम आमच्या पक्षाने केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, काँग्रेसला ७० जागा लढवून फक्त १९ ठिकाणी यश मिळाले. या स्थितीला जबाबदार कोण, आपले कुठे चुकले याचा विचार काँग्रेसने करावा. बिहारमध्ये आमचा पक्ष पाच वर्षांपासून मेहनत घेत होता. त्यामुळे आजचे यश मिळाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही पोटनिवडणूक लढवली नाही. तेथे काँग्रेसला यश का मिळाले नाही? पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात ‘एमआयएम'ने यावे, अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी आहे. यासंदर्भातील निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवावी किंवा नाही; तसेच औरंगाबाद महापालिका निवडणुकीत कोणासोबत युती करावी याचा निर्णयही पक्षाचे नेते ओवेसी घेतील, असे जलील म्हणाले.

गडबड करण्यात भाजपचा हातखंडा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी गडबड झाल्याचे कानावर आले आहे. भाजपच्या उमेदवारांनी पराभव समोर दिसताच मतदान केंद्र सोडले होते. त्यांनी परत येत मतमोजणीवर आक्षेप घेतला व त्यांना विजयी घोषित करण्यात आले. गडबड करण्यात भाजपचा हातखंडा आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top