
छत्रपती संभाजीनगर: राज्यभर गाजत असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. या आचारसंहितेनुसार छत्रपती संभाजीनगर शहरात पहिलाच विवाह गुरुवारी (ता.१२) सिडकोतील काळा गणपती मंदिर परिसरात पार पडला.