
कळंब : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पथकाचा तालुक्यात तीन दिवसांचा दौरा होणार असून, या दौऱ्यात शासकीय धान्य गोदाम,शालेय पोषण आहार, अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पूरक आहाराची गुणवत्ता, तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीची कार्यप्रणाली तपासली जाणार आहे.त्यामुळे पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आला आहे.