Wildlife: वन्यप्राणी गणनेबाबत वनखात्याने गांभीर्य ठेवावे

डॉ. किशोर पाठक: सत्तावीस पाणस्थळांवर रात्रभर गणना
Wildlife
WildlifeSakal

औट्रमघाट गौताळा अभयारण्य निसर्ग निर्मित आहे.जैव विविधता टिकवण्यासाठी अभयारण्याचे संवर्धन झाले पाहिजे ‌व वन्यप्राणी गणना गांभीर्याने होण्याची गरज आहे, असे मत मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी बुधवारी (ता.२२) व्यक्त केले. दरवर्षी मे महिन्यात बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी गणना होते. यंदाही अभयारण्यातील २७ पाणस्थळांवर निसर्ग अभ्यासकांनी प्रगणनेत सहभाग घेतला. तत्पूर्वी हिवरखेडा नाका येथे डॉ. पाठक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

प्रास्ताविकात सहायक वन्यजीव संरक्षक विशाल लोंढे म्हणाले की, उन्हाळ्यात पाणस्थळे मर्यादित होतात. २४ तासांतून एकदा का होईना वन्यप्राणी पाण्यासाठी पाणस्थळांवर येतात. बौद्ध पौर्णिमेला चंद्र मोठा व आकाश निरभ्र असते. त्यामुळे वन्यप्राण्यांचे निरीक्षण स्पष्टपणे करता येते. कन्नड परिमंडळात अकरा व नागद सात व पाटणा जंगलातील सात पाणस्थळांवरील मचाणावर सत्तावीस प्राणी निरीक्षक प्राणी गणनेत सहभागी झाले आहेत.

यासाठी निसर्ग अनुरूप रंगसंगतीचे कपडे वापरावेत, अत्तर व सुगंधी तेलाचा वापर करू नये, मोठ्या आवाजात बोलू नये, मद्यप्राशन, गुटखा सेवन करू नये, मोबाइल बंद ठेवावा आदी सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांनी केल्या. याप्रसंगी नगरपरिषदेचे प्रशासक नंदकिशोर भोंबे, कवी प्रा. वि. रा. राठोड, बापू गवळी, शिवाजी शिंदे, संजय मेंढे, सचिन चौधरी, जावेद देशमुख, मिर्झा बेग, रूपेश काथार, वनरक्षक पी. जे. पारधी, आर. पी. वानखेडे, एस. ए.पठाण, के. बी. रियसिंग, कोळी, वनपाल समाधान पाटील, हरिदास तुपे आदींची उपस्थिती होती.

Wildlife
Bio-Fertilizer: शेणखताला आले ‘सोनेरी दिवस’

आक्रसून बसलेले वन्यजीव हळूहळू बाहेर पडू लागले

दिवसभर आग ओकणारा सूर्य पश्चिमेला दिसेनासा झाला आणि पूर्वेकडून चंदेरी आभा घेऊन चंद्र उगवला. पाण्याच्या बाटल्या व मर्यादित साहित्य घेऊन वन्यप्रेमी गणक चंदननाला, गौताळा तलाव, ब्राह्मणी तलाव, चिंच टेकडी सोंड, जामदरा, खारी खोरा या आपापल्या माणसाकडे निघाले. सगळ्या जंगलावर चंद्राच्या शीतल उजेडाची पखरण झाली. चंदन नाल्यातून मोरांचे आवाज घुमू लागले. ऊन आणि मानवी हस्तक्षेपामुळे झाडी झुडपात, डोंगरदऱ्यात आक्रसून बसलेले वन्यजीव हळूहळू बाहेर पडू लागले.

डॉ. पाठक यांनी व्यक्त केली खंत

यावर्षी वन्यजीव विभागाने ‘पाणस्थळांवर निरीक्षण व निसर्ग अनुभव कार्यक्रम’ असे नाव या मोहिमेला दिले आहे. याबद्दल डॉ. पाठक यांनी खंत व्यक्त करत म्हणाले की, वन्यप्राणी गणना किमान निसर्गाचा अभ्यास असलेल्यांनाच सहभागी करून घेतले पाहिजेत. ज्यांना कोल्हा व लांडग्यातला फरक कळत नाही ते प्रगणना करतील, तर निसर्ग सहल आणि वन्यप्राणी गणना यात तो फरक आहे? वन्यप्राणी गणनेतील गांभीर्य वनविभागाने राखावे, असे आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com