जंगलात गस्तीला गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची दुचाकी चोरीला

जंगलात गस्तीला गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची दुचाकी चोरीला
Published on: 
गस्तीवरील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची दुचाकी पळविली ---- शिवणी वनक्षेत्रातील घटना; इस्लापूर पोलिसांत तक्रार दाखल ----- ईस्लापूर, ता. २४ (बातमीदार) : शिवणी (ता. किनवट) येथील वन विकास महामंडळाच्या वनक्षेत्रात गस्तीसाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता. २४) घडली. शिवणी येथील वन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चोले हे वन कर्मचाऱ्यांसह नियमित गस्तीसाठी जंगलात गेले होते. यावेळी त्यांनी जंगलाच्या कडेला तीन दुचाकी उभ्या केल्या आणि कर्मचाऱ्यांसह जंगल परिसरात गस्त घालण्यास सुरवात केली. दरम्यान, या संधीचा फायदा घेत चोरट्याने तीन दुचाकींपैकी एक दुचाकी (एमएच ३३ झेड ५१८२) चोरून नेली. दुचाकी गायब झाल्याचे लक्षात येताच दुचाकीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी इस्लापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड, वन्यजीवांची शिकार आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी वन कर्मचारी नियमित गस्त घालत असतात. अशा परिस्थितीत गस्तीला गेलेल्या कर्मचाऱ्याचीच दुचाकी चोरीला गेल्याने वनक्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील चोरट्याचा शोध घेऊन दुचाकी परत मिळविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com