Ashokrao Dongaonkar: माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांचे निधन
Maharashtra Politics: माजी राज्यमंत्री आणि दोन वेळा आमदार असलेले अशोकराव पाटील डोणगावकर यांचे निधन झाले. सहकार, शिक्षण आणि विकास क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता. डोणगावमध्ये रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर: माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर (वय ८१, रा. सहकारनगर) यांचे शनिवारी (ता. ५) सकाळी शहरात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (ता. ६) सकाळी मूळगावी डोणगाव (ता. गंगापूर) येथे सकाळी अकराला अंत्यसंस्कार होतील.