
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सोमवारी (ता. १९) मध्यरात्रीनंतर सर्वदूर मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. सहा दिवसांपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. परभणी, हिंगोली, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार विजांच्या कडकडाटात मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.