Vaijapur Crime sakal
छत्रपती संभाजीनगर
Vaijapur Crime : कर्नाटकातील भाविकांना चौघांनी लुटले; कारमधून आलेल्यांनी टेंपो ट्रॅव्हलर अडवून पळविला दोन लाखांचा ऐवज
Cash Theft : सोमवारी पहाटे कर्नाटका येथील भाविकांना मुंबई-नागपूर महामार्गावर वैजापूरच्या भग्गाव-बेलगाव भागात मिनी बस अडवून लुटण्यात आले. कारमधून आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज, त्यात सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.
वैजापूर : मिनी बस अडवून कारमधून आलेल्या चौघांनी कर्नाटकातील भाविकांना चाकूचा धाक दाखवत सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील भग्गाव-बेलगाव (ता. वैजापूर) भागात सोमवारी (ता. १७) पहाटे घडली.

