दशमेशनगरात फोडली चार दुकाने | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दशमेशनगरात फोडली चार दुकाने

औरंगाबाद : दशमेशनगरात फोडली चार दुकाने

औरंगाबाद : दशमेशनगर येथे चोरट्यांनी एकाच वेळी तीन दुकाने फोडून जवळपास एक लाख रुपयांचा माल चोरुन नेला. ही चोरी बुधवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली.

दशमेशनगर महादेव मंदिरासमोर शिव कॉम्प्लेक्स व जवळच्या तीन दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी विनायक किचन ट्रॉलीज दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत रोख ९३ हजाराची रोख रक्कम चोरून नेली. तसेच शेजारील संजोग दिवाकर बडवे यांचे जय डिस्ट्रीब्युटर्स नावाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला.

हेही वाचा: गंगाजमुना परिसर सील का केला? उच्च न्यायालयाची पोलिस आयुक्तांना नोटीस

संजय खडके यांच्या श्रद्धा मेडिकल तसेच मोरे यांची कामधेनु दुकानाचे शटर उचकटून चोऱ्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सुरेंद्र चन्ने (रा. श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी, एन ८, सिडको) यांच्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. सुर्यतळ हे करत आहेत.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

कॉम्पलेक्समधील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी करणारे चोरटे विविध ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाले. त्याच आधारे शेख मजहर याला पकडले. त्याचे तीन साथीदार मात्र पसार झाले आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथकही आरोपींच्या मागावर आहे.

loading image
go to top