

सिल्लोड : चारवर्षीय मुलीस निर्दयपणे मारहाण केल्यामुळे तिच्या शरीरावर झालेल्या जखमांमध्ये पू (पस) झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील मोगलपुरा परिसरात गुरुवारी (ता. २७) सकाळी समोर आली. पोलिसांनी संशयित आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले. आयात फईम शेख असे मृत बालिकेचे नाव आहे.