वृद्धेची साडेचार लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक

वृद्धेची साडेचार लाखांची फसवणूक

औरंगाबाद - कंपनीच्या आयुर्वेदिक उत्पादने खरेदी करण्याच्या तसेच कंपनीच्या नोंदणीसाठी वृद्धेची तब्बल चार लाख ५५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जुलै २०२० पासून घडत होता. याप्रकरणी विमल बालाजी सोनार (५७, देवगीरी बँकेजवळ, सिडको एन-७) यांनी सिडको पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. दिलीप गणेशराव जैस्वाल (रा. संग्रामनगर, सातारा परिसर) आणि प्रिती राजेंद्र बडगुजर (रा. श्रेयनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी विमल सोनार यांच्या फिर्यादीनुसार जुलै २०२० मध्ये त्यांच्या मुलासह त्या नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. तिथे त्यांना Vestige या कंपनीच्या नावाने वेगवेगळे आयुर्वेदिक व इतर उत्पादने दिसली. त्यावर नातेवाईकांनी जैस्वाल यांच्याकडून आपण खरेदी केल्याचे सांगितले. दरम्यान विमल यांना तुम्हाला विकत घ्यायची असतील तर जैस्वाल यांची भेट घ्यावी लागेल असे सांगत ऑगष्ट २०२० मध्ये दिलीप जैस्वाल, त्यांच्या पत्नी रचना जैस्वाल, प्रिती बडगुजर या तिघांनी आपण वेस्टीज कंपनीचे साहित्य विक्रीचे काम करतो असे सांगितले.

जैस्वाल यांनीतुम्हाला साहित्य घ्यायचे असेल तर आधी नोंदणी आयडी काढावा लागेल, नंतर तुम्हाला कमी किमतीत साहित्य मिळेल, ते विकून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता असे सांगितल्याने विमल यांचा विश्वास बसला आणि त्या नोंदणी आयडी काढण्यासाठी तयार झाल्या. त्यासाठी आजवर फोन पे, धनादेश या स्वरुपात वेळोवेळी ४ लाख ५५ हजार रुपये दिले. मात्र ना कंपनीचा नोंदणी आयडी, ना कंपनीचे साहित्य मिळाले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विमल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन दिलीप जैस्वाल आणि प्रिती बडगुजर यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक अन्नलदास करत आहेत.

Web Title: Fraud Of Four And A Half Lakhs Of Old Age

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top