
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात मागील वर्षी ‘शंभर टक्के, मुलींसाठी मोफत शिक्षण योजना’ जाहीर केली होती. मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, शिक्षणात समान संधी उपलब्ध व्हावी आणि समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थिनी मुख्य प्रवाहात याव्यात, या उद्देशाने ही योजना साकारण्यात आली.