आत्मनिर्भर अभियानांतर्गत हरभरा मिनीकिट मोफत वाटप

आत्मनिर्भर अभियानांतर्गत हरभरा मिनीकिट मोफत वाटप
Published on: 
आत्मनिर्भर अभियानांतर्गत हरभरा मिनीकिट वाटप बीड, ता. १८ (बातमीदार) : रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आत्मनिर्भर अभियान-कडधान्य अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे मिनीकिट स्वरूपात तब्बल १०० टक्के अनुदानावर म्हणजेच पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे. या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी २० आर ते जास्तीत जास्त ४० आर क्षेत्रापर्यंत बियाणे संच दिले जातील. लाभार्थ्यांची निवड शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पारदर्शक तत्त्वावर केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अशा मिनीकिटचा लाभ मिळाला आहे, त्यांना पुढील दोन वर्षे याचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. हरभरा पिकाच्या प्रत्येक मिनीकिटचे वजन १६ किलो असून, त्याची कमाल किंमत १ हजार ६५४ रुपये आहे. या किटमध्ये प्रमाणित बियाणे, जैविक खताची पाकिटे आणि मराठी भाषेतील पीक लागवड माहितीपुस्तिका असेल. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज दाखल करावा आणि मोफत बियाणे वाटप योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com