मोफत ‘एमआरआय’ सेवा पूर्ववत; गोरगरीब रुग्णांना दिलासा!

मोफत ‘एमआरआय’ सेवा पूर्ववत; गोरगरीब रुग्णांना दिलासा!
Published on: 
ABD26J81363 ------------- हिंगोलीत मोफत ‘एमआरआय’ सेवा पूर्ववत! - आठवडाभरापासून जिल्हा रुग्णालयात सुविधा सुरू; दररोज २५ ते ३० रुग्णांना लाभ --- सकाळ वृत्तसेवा हिंगोली, ता. १५ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील मोफत एमआरआय सुविधा अखेर पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दिलासा मिळाला असून, खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्चून एमआरआय करण्याची वेळ आता टळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली ही सेवा सुरू झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने १ मे २०२६ पासून हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत सीटी स्कॅन आणि एमआरआय सेवा सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत क्रस्ना डायग्नोस्टिक्स या संस्थेमार्फत ही सुविधा पुरविली जाते. मात्र, संबंधित संस्थेचे बिल थकल्याने एमआरआयची मोफत सेवा बंद करण्यात आली होती. सप्टेंबर महिनाभर ही सुविधा बंद राहिल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. परिणामी, अनेक गरीब रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयात पैसे खर्च करून एमआरआय तपासणी करावी लागत होती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर सेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या थकीत बिलाचा प्रश्न सुटल्यानंतर आठवडाभरापासून मोफत एमआरआय सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे आवश्यक तपासणी टाळण्याची वेळ येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. -- ‘खासगी’तील रुग्णांना नाममात्र शुल्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज सुमारे २५ ते ३० रुग्णांचे एमआरआय केले जातात. यामध्ये शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचा समावेश असतो. शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी ही सुविधा मोफत, तर खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे. --- पाच महिन्यांत ९३५ जणांचे ‘एमआरआय’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या पाच महिन्यांपासून ‘एमआरआय’ सुविधा उपलब्ध झाली. या कालावधीत ९३५ रूग्णांचे एमआरआय करण्यात आले आहे. या मोफत सुविधेमुळे गोरगरीब रूग्णांना दिलासा मिळत आहे. -- जिल्हा रुग्णालयातील ‘एमआरआय’ तपासणी महिना - रुग्ण संख्या मे - १७७ जून - २०७ जुलै - २५७ ऑगस्ट - १५० सप्टेंबर - १४४ --------- ((कोट)) जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आल्यापासून आरोग्य सुविधांत भर पडली आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांची संख्या वाढली असून, रेफरचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. मध्यंतरी काही दिवस मोफत एमआरआय सुविधा बंद होती. मात्र, गंभीर रुग्णांचे मोफत एमआरआय केले जात होते. गेल्या आठवडाभरापासून ही सुविधा पूर्ववत सुरू झाली असून, रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. - डाॅ. श्रीचक्रधर मुंगल, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com