ABD26J78902 गंगापूर ः अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांना ‘मैत्री जिवांचे पुरस्कार’ देऊन सन्मानित करताना गुणेशराव पारनेरकर. सोबत राजेश वाणी व दिनेश धाकड.
----
अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांचा सन्मान
----------
गंगापूर, ता. ९ (बातमीदार) : मैत्री ही केवळ एक नाते नसून दोन जिवांना जोडणारा अतूट बंध आहे, या भावनेतून सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘मैत्री जिवांचे पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत गजानन माधव पाठक व दिवंगत माधवराव व्यंकटेश वेल्हाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा रविवारी (ता. सहा) धुळे येथील हॉटेल राधाकृष्ण, रूपामाई शाळेसमोर, नकाणे रोड, देवपूर येथे पार पडला.
सोहळ्यात येथील अनुप शर्मा व प्रशांत मुळे यांना ‘मैत्री जिवांचे पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुसेवा मंडळ, पारनेरचे अध्यक्ष गुणेशराव पारनेरकर होते. तसेच ओमशांती ग्रुपचे राजेश सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सौरभ वर्तक यांनी बासरीवादन, तर पंडित रामदास पळसुले यांचे शिष्य प्रसाद वेल्हाणकर, पुणे यांनी तबल्याची साथ देत रसिकांना मंत्रमुग्ध केले.