Success Storysakal
छत्रपती संभाजीनगर
Success Story: ‘प्रज्वल’ला मिळाली ‘निसार’वर शिकण्याची संधी; छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी, दोन महिन्यांपासून ‘इस्रो’त इंटर्नशिप
Prajwal Hivale: छत्रपती संभाजीनगरच्या प्रज्वल हिवाळेला इस्रोमध्ये इंटर्नशिप करताना निसार प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली आहे. नासा-इस्रोचा संयुक्त उपग्रह पर्यावरणीय बदल व आपत्तींचे निरीक्षण करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार ‘निसार’ हा इस्रो आणि नासाचा संयुक्त उपग्रह ३० जुलैला अवकाशात झेपावणार आहे. ही मोहीम पृथ्वीवरील पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक आपत्तींचे अचूक निरीक्षण करणार आहे.