Vaijapur Court : हथकडीसह फरार आरोपी न्यायालयात स्वतः हजर
Police Actions : वैजापूर जिल्हा न्यायालय परिसरातून फरार झालेल्या आरोपीने गुरुवारी न्यायालयात स्वतः हजर होऊन कौटुंबिक कारणामुळे पळून गेल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सायंकाळी हर्सूल कारागृहात पाठवले.
वैजापूर : मागील महिन्यात वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातून फरारी आरोपी गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर न्यायालयासमोर स्वतःहून हजर झाला. कौटुंबिक कारणामुळे पळून गेल्याचे त्याने न्यायालयासमोर कबूल केले.