बीडमध्ये अवैध जुगार

बीडमध्ये अवैध जुगार
Published on
जुगार अड्ड्यावर छापा, २३ जणांवर कारवाई ----- बीड, ता. २ : शहर आणि अमळनेर पोलिस ठाणे हद्दीत जुगाराच्या दोन प्रकरणांत २३ जणांवर, तर अवैध दारूविक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत सात लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भारत पाढरे यांच्या विशेष पथकाला मंगळवारी (ता. एक) रात्री साडेअकराच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीतील हिरालाल चौक परिसरातील मारुती मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी १४ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतील डोंगरकिन्ही येथील एका हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. कारवाईत नऊ जण जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच परिसरात अवैधपणे दारूची विक्री होत असल्याचेही निदर्शनास आले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १३ हजार ९० रुपयांची अवैध दारू व मोबाईल जप्त करण्यात आला. पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत १४, तर अमळनेर हद्दीत जुगारप्रकरणी नऊ आणि दारू विक्रीप्रकरणी एक अशा एकूण २४ जणांवर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com