((तनिष्का व्यासपीठ लोगो ः ABD२६J७९४४०)))
(((भक्ती-शक्ती लोगो वापरा ः ABD२६J७९४४१)))
---
अथर्वशीर्षातून होणार गणरायाचा जयघोष
---
‘तनिष्का’ आणि ‘विहिंप’तर्फे शहरात चार ठिकाणी उपक्रम
----
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः श्री गणेशाच्या मंगलमय आगमनानिमित्त वातावरण भक्तिमय झाले. यामुळे यंदा चार वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. ‘सकाळ-तनिष्का व्यासपीठ’ आणि ‘विश्व हिंदू परिषद-मंदिर अर्चक पुरोहित आयाम’ यांच्यावतीने हा भक्तिमय उपक्रम राबविला जात आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला दरवर्षी उंंदड प्रतिसाद मिळतो. यामुळेच यंदा शहरात एकाऐवजी चार ठिकाणी पठण होणार आहे. सामूहिक प्रार्थनेतून मनःशांती, सकारात्मक ऊर्जा मिळण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांना बळकटी मिळते, असा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहपरिवार सहभागी होऊन भक्तीचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले. अधिक माहितीसाठी श्रुती काटे (९१३०६३२२२१) यांच्याशी संपर्क साधावा.
---
कधी, कुठे? (वेळ : सकाळी ८ वाजता)
सोमवार (ता. २१ सप्टेंबर) : भक्ती गणेश मंदिर, एन-१, सिडको
मंगळवार (ता. २२ सप्टेंबर) : वरद गणेश मंदिर, समर्थनगर
बुधवार (ता. २३ सप्टेंबर) : गणपती मंदिर, पत्रालालनगर
गुरुवार (ता. २४ सप्टेंबर) : छावणी गणेश महासंघ, केशर सुपर मार्केट