गौरी-गणपती उत्सवातील सजावट साहित्य १० टक्क्यांनी स्वस्त

गौरी-गणपती उत्सवातील सजावट  साहित्य १० टक्क्यांनी स्वस्त
Published on
((आले गणराय)) ------ OSM26B06948 धाराशिव ः शहरातील मुख्य बाजारपेठेतील सजावट साहित्याच्या दुकानात फुलांच्या लडीची पाहणी करताना ग्राहक. --- गौरी-गणपती उत्सवातील सजावट साहित्य १० टक्क्यांनी स्वस्त ----- यंदा लायटिंगचे अनेक प्रकार; विविध फुलांच्या लडींनी बाजार सजला ----- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ९ : गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकडून सजावटीची तयारी सुरू झाली आहे. इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची रेलचेल वाढली आहे. यंदा काही इलेक्ट्रिक साहित्याच्या किमतींत सुमारे १० टक्क्यांनी घट झाली आहे. विविधरंगी दिव्यांच्या माळा, झुंबर, इलेक्ट्रिक समई, बहुरंगी फोकस, रंगीत तोरणमाळ यासह यंदा थ्रीडी-टूडी लाइट, स्टार लाइट, ऑप्टिकल लाइट, मेटल लाइट माळा, लेझर लाइट आणि संगीतमय लाइट माळांना विशेष पसंती मिळत आहे. यापूर्वीच्या सणांमध्ये घटलेली मागणी आणि सध्याची दुष्काळी स्थिती आदींमुळे दिवे आणि संबंधित साहित्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. किमती कमी झाल्याने स्वस्तात अधिक आकर्षक सजावट करण्याचा पर्याय ग्राहकांना सध्या उपलब्ध आहे. साधारण ६० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. यंदा कमी लांबीच्या लायटिंग बाजारात आल्या आहेत. शहरातील काळा मारुती चौक ते नेहरू चौक यादरम्यानच्या मुख्य बाजारपेठेतील इलेक्ट्रिक साहित्याची दुकाने विविध प्रकारचे सजावटीचे कृत्रिम हार (फुलांच्या लडी) आणि दिव्यांच्या माळांच्या रोषणाईने उजळून निघाली आहेत. गणेशोत्सवातील सजावटीत दरवर्षी नवनवीन प्रकार दाखल होतात. यंदाही ग्राहकांना पारंपरिक दिव्यांपासून अत्याधुनिक रोषणाईपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. घरातील गणपतीसाठी छोट्या आकारातील साहित्यासह हटके सजावटीसाठी संगीतमय लाइट माळा, इलेक्ट्रिक कारंजे, लेझर लाइट आणि विविध रंग बदलणारे फोकस ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. --- पारंपरिक सजावटीसोबत आधुनिक प्रकाशयोजना सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही सजावटीच्या साहित्याची मागणी होत आहे. मंडपाचा आकार, उंची आणि त्यातील देखाव्यांचे नियोजन आदी लक्षात घेऊन रोप लाइट, नवार पट्ट्या, ड्रॉप लाइट, प्रोजेक्टर, मोठ्या क्षमतेचे फोकस आणि लेझर लाइटचा वापर करण्याकडे मंडळांचा कल आहे. पारंपरिक सजावटीसोबत आधुनिक प्रकाशयोजना करण्यावर भर दिला जात आहे. -- चांगल्या दर्जाचे साहित्य खरेदीकडे कल यंदा पर्यायांची संख्या वाढल्याने ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारांची तुलना करून चांगल्या दर्जाचे इलेक्ट्रिक साहित्य खरेदी केली जात आहे. एकदा खरेदी केलेले इलेक्ट्रिक साहित्य पुढील काही वर्षे वापरता येत असल्याने, थोडे अधिक पैसे गेले तरी चालतील पण चांगल्या दर्जाचे सावट साहित्य घेण्याकडे मंडळांसह घरगुती ग्राहकांचा कल आहे. ----- ((कोट)) यंदा विविध कलरचे फोकस, विविध लांबीच्या दिव्यांच्या माळा, गणरायाची मखर, विविध फुलांच्या लडी, गौरीसाठी कर्टन, लेझर लाइट, सप्तरंगी माळा आदींना मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक साहित्याच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून यंदा अधिक प्रमाणात खरेदी होण्याची अपेक्षा आहे. घरगुती सजावटीसोबत मंडळांकडूनही साहित्याची चौकशी सुरू झाली आहे. - रणजित वाडकर, विक्रेता, धाराशिव ---- ((कोट)) यंदा गणेशोत्सवात लंकादहन हा देखावा करणार आहोत. त्याची तयारी सुरू आहे. हा देखावा सुंदर व्हावा म्हणून कलात्मक पद्धतीने विविध प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी बाजारातून आवश्यक इलेक्ट्रिक साहित्य व फोकस खरेदी करणार आहोत. - प्रा. भालचंद्र हुच्चे, बालहनुमान गणेश मंडळ, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com