शहरातील किराणा बाजारपेठेला गणराया पावला

शहरातील किराणा बाजारपेठेला गणराया पावला
Published on
शहरातील किराणा बाजारपेठेला गणराया पावला --- तेल, साखर, रवा, डाळ, पत्रावळीसह इतर साहित्याला मागणी; कोटींची उलाढाल ---- सकाळ वृत्तसेवा : जालना, ता. २० : गणेशोत्सवाच्या सांगतेला अवघे पाच दिवस उरले असून, आता शहरातील बाजारपेठेत भंडाऱ्याच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याची खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. तेल, साखर, गहू, रवा, डाळ, शेंगदाणे, पत्रावळी यासह विविध साहित्याला मोठी मागणी आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. पोळा व गौरी सणाला अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता गणेशोत्सव किराणा मार्केटला पावला आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात अनेक गणेश मंडळांकडून भाविकांसाठी भंडारा आयोजित केला जातो. त्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते सध्या भंडाऱ्यासाठी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. मोठ्या मंडळांकडून घाऊक प्रमाणात खरेदी केली जात असल्याने किराणा बाजारात उलाढाल वाढली आहे. दरम्यान, शहरातील किराणा दुकाने तसेच घाऊक बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तेल, साखर, गहू, रवा, शेंगदाणे, डाळी, मसाले, पत्रावळी, ग्लास आदी साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मंडळांच्या मागणीनुसार व्यापाऱ्यांनीही आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. --- ((कोट)) विसर्जन मिरवणुकीपूर्वी भंडारा उरकण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. मंडळाच्या सदस्यांकडून साहित्याची यादी तयार करून खरेदी केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारपेठेत खरेदीची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या किराणा मालाचे दरही स्थिर आहेत. जिल्हाभरात येथून पुढे दिवसाला साधारण एक कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. - सतीश पंच, अध्यक्ष व्यापारी महासंघ ---- इन्फो किराणा साहित्याचे दर (प्रतिकिलोमध्ये) साखर : ५० ते ५५ गूळ : ४३ ते ४७ शेंगदाणे : १३५ ते १४० तेल : १६५ रवा : ४० गहू : ३२ ते ३५ तूर डाळ : ११५ ते १२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com