‘श्रीं’च्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरवात

‘श्रीं’च्या मिरवणूक मार्गावर 
खड्डे बुजविण्यास सुरवात
Published on
धाराशिवः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘श्रीं’च्या विसर्जन विहीर परिसरातील रस्त्यावरील बुजविण्यात आलेले खड्डे.OSM26B07040 -- ‘श्रीं’च्या मिरवणूक मार्गावर खड्डे बुजविण्यास सुरवात धाराशिव, ता. १९ (बातमीदार) : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या काम सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांत मिरवणूक मार्गावरील काही रस्त्यांवरील खड्डे काँक्रीटीकरण करून बुजविण्यात आले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अडचण येऊ नये आणि गणेशमूर्तींची सुरक्षितपणे मिरवणूक काढता यावी, यासाठी विसर्जन मिरवणुकीपूर्वी हे खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमधून आणि गणेश मंडळांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत पालिकेने आता प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका प्रमुख रस्त्यांवरून निघतात. या सर्व मूर्तींचे विसर्जन समतानगरजवळील श्री विसर्जन विहिरीत केले जाते. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (ता. १८) पालिकेच्या वतीने विसर्जन विहीर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे काँक्रीटच्या साहाय्याने बुजविण्यात आले. रस्ते दुरुस्तीसोबतच पालिकेने विसर्जन विहीर आणि तिच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com