गंगाखेडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

गंगाखेडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
Published on
मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा ------------ गंगाखेडला २५ हजार ९७० रुपयांचा ऐवज जप्त गंगाखेड, ता.२ (बातमीदार): शहरातील नवा मोंढा परिसरातील कच्छवे कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, दोन मोबाइल, मटका जुगाराच्या चिठ्ठ्यांसह एकूण २५ हजार ९७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सोमवारी (ता.३१) सायंकाळी कच्छवे कॉम्प्लेक्स, नवा मोंढा परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अमोल दशरथ साळवे (वय ३४, रा. आंबेडकरनगर, गंगाखेड) आणि जगदीश माधवराव तांदळे (वय ३९, रा. तांदुळवाडी, ता. गंगाखेड) हे मटका जुगार खेळताना आढळून आले. अमोल साळवे याच्याकडून १२ हजार ६४० रुपये रोख, सॅमसंग कंपनीचा सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाइल व कल्याण नावाच्या मटका जुगाराच्या चिठ्ठ्या, तर जगदीश तांदळे याच्याकडून १३ हजार ३३० रुपये रोख, मोबाईल व मटका जुगाराच्या चिठ्ठ्या असा एकूण २५९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप संतुकराव जाधव यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस स्टेशन येथे अमोल दशरथ साळवे, भारत दशरथ कोकडवाड, जगदीश माधवराव तांदळे, मारुती गोपाळराव आसमार, कच्छवे कॉम्प्लेक्सचे मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com