

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
कायगाव: गंगापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एक जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत जय हिंद शुगर कारखान्याकडून उसाचे कोट्यवधींचे देयक थकल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उसाची तोड होऊन तीन महिने उलटूनही पैसे न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती थकबाकीत गेली असून, खासगी सावकारांचा तगादा वाढला आहे.