

Gangapur Schools
esakal
गंगापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील ११ शाळांमधील तब्बल ३७ वर्गखोल्या अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आल्या असून, त्या कधी कोसळतील याचा नेम राहिलेला नाही. एका बाजूला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सरकारी दावे केले जात असताना, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष वर्गखोल्या धोकादायक बनल्याचे चित्र समोर आले आहे.